!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!!
भाग - २. गोपाळराव कल्याणहून आपल्या ठाण्याच्या घरी पोहोचले. दार उघडले तर दरवाज्यात घरून संगमनेरहून आलेले पत्र होते. नेहमीचेच उपदेश, लग्नाबद्दल असेल असे वाटून न वाचताच त्यांनी तसेच ठेवून दिले. खरं म्हणजे त्यांना दुसऱ्याच पत्राची अपेक्षा होती. पुण्यातील परशुरामशास्त्री पंडित विधवा विवाह जमवतात असे ऐकून होते. म्हणून गोपाळरावांनी त्यांना लिहिले होते... मला विधवा विवाह करायची इच्छा आहे. ती विधवा कोणत्याही जातीची कुळशील, घरंदाज नसली, तिचा पाय घसरलेला, एखादे मूलबाळ असले तरी चालेल. पण तिची लिहिण्या वाचण्याची तयारी असावी. नवरा म्हणून तिच्याकडून मला काही नको. पुण्यात सुधारक तर खूप आहेत. पण प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली की माघार घेतात. मला एवढेच दाखवायचे आहे की, पुरुषांप्रमाणे बाईही लिहू वाचू शकते. पण आज पंधरा दिवस झाले तरी त्यांचे कडून उत्तर आले नव्हते. गोपाळरावांनी अंथरुणावर अंग टाकलं. पण झोप येत नव्हती. त्यांना पहिली पत्नी...