Posts

Showing posts from October, 2025

परतीचा फराळ

Image
 *परतीचा फराळ!* परतीचा पाऊस असतो तसा परतीचा फराळही असतो. आठवणी देऊन जाणारा आणि जाताजाता हुरहूर लावणारा ...! घराघरात कुशल गृहीणी आता डब्यांची अदलाबदल करुन संपुर्ण घराला कन्फ्युज करायला सुरुवात करतात. *मोठ्या डब्यांमधला फराळ लहान डब्यात शिफ्ट होतो.* निवडणुका संपल्यावर नेतेमंडळी दिसत नाहीत, तसा कालपर्यंत समोर असलेला फराळ आता शोधावा लागतो. ओल्या नारळाच्या करंज्या *एखाद्या सौंदर्यसाम्राज्ञीने आलिशान कारमधे बसून नीट दर्शनही न देता वेगानं निघून जावं* तशा केल्या आणि संपल्या सुध्दा अशा गायब होतात. चकलीच्या डब्यावर सगळयांचाच डोळा असतो. पण शेवटची चकली खाताना होणारा आनंद प्रचंड असतो. ती खाल्ल्यावर *डबा घासायला न टाकता झाकण लावून तो तसाच ठेवणा-याला फसवणे आणि अपेक्षाभंग करणे या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी* असं माझं मत आहे. *पाहुण्यांसाठी मागच्या रांगेत लाडवाचा डबा लपवला जातो.* कारण लहानपणापासून दिवाळी झाल्यानंतर महत्वाचे फराळाचे पदार्थ संपल्याचे कळताच येणारे पाहुणे हा एक खास वर्ग आहे हे पटलंय. *प्रत्येक फराळाच्या पदार्थाची एक एक्सपायरी डेट असते.* ती गृहीणींना अचूक माहीती असते. इतके दिवस विचारा...

शिक्षण बदलते आहे.....

जागतिकीकरण सुरू झाले आणि अचानकपणे भारतातल्या पोरी सुंदर असल्याचा साक्षात्कार जगाला होऊ लागला! ‘मिस वर्ल्ड’ काय, ‘मिस युनिव्हर्स’ काय, भारतीय मुली डोक्यावरचा मुकुट मिरवू लागल्या. भारतातल्या कन्या सुंदर असल्याचा साक्षात्कार होण्याचे मुख्य कारण होते, भारताची बाजारपेठ. जगाची एकपंचमांश लोकसंख्या भारतात राहते. सौंदर्याची मोठी बाजारपेठ इथे उभी राहू शकते!   🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌   * https://chat.whatsapp.com/CRPiDnTjfnRJv017X6J5EK* 👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा* *`सौजन्य व संकलन `* *----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----* तसेच आता भारतातल्या शाळा आणि भारतातले काही शिक्षक जागतिक दर्जाचे आहेत, असा साक्षात्कार जगाला होऊ लागला आहे. ज्या शिक्षकांची शिक्षणविषयक मांडणी सामान्य आहे, शिक्षक म्हणून त्यांनी काही फार मोठे योगदान दिलेले नाही, अशा शिक्षकांना अचानक डॉलर्समध्ये मोठे पुरस्कार मिळू लागले आहेत. ते शिक्षक फार मोठे काम करत आहेत, असे नाही. शिक्षणाच्या अनुषंगाने भारताएवढी मोठी बाजारपेठ जगात कुठेच नाही, हे खरे कारण. भारताची लोकसंख्या महाकाय. त्यात तरुणांची लोकसंख्या सर्वाधिक. शिकू ...