चप्पल.......






*चप्पल* 

                          डाॅ.अश्विनी म्हमाणे.


आज सकाळी शु रॅक साफ करायला अंजुला सांगितलं होतं .ती एक एक चपला काढत होती तशी मी भूतकाळ जात होते. इतक्या चपलांचे जोड !माझेच मला नवल वाटत होते. ..ही भावाच्या लग्नाला घेतलेली ... हि ब्ल्यु ड्रेस वर मॅचिंग. हे ट्रेकिंगचे शूज ... असे कितीक चप्पलांचे जोड मी जमवले होते. ... अपरिग्रह:चे पालन मी विसरले होते . आजकाल गोष्टी जमावण्याकडे कलच असतो .जोरदार मार्केटिंग आर्थिक सुबत्ता ,आणि दिखाऊ पाणा ची चढाओढ दुसरं काय?

मग आठवली लहानपणीची ती निळी चप्पल ... शाळा असो कोणता सामारंभ असो किंवा अगदी कोणाचे लग्न जरी असले तरी कोणत्याही ड्रेस वर ती निळी चप्पल आम्हाला साथ देत होती ..अगदी वर्षाच्या सुरवातीला आणली कि वर्ष दीड वर्ष बघायला नको. टिकाऊ ...


त्या दिवशी आमच्याकडे माझ्या बाबांचे मित्र व त्यांची माझ्यापेक्षा वयाने जरा मोठी मुलगी बॉबी मुंबईवरून बाबांना भेटायला आलेले . बॉबी च्या गुढग्यापर्यंन्तच्या ड्रेस मुळे तिचे नितळ पाय मला लगेच दृष्टी ला पडले होते . मी माझ्या पायांकडे पहिले . मातीत खेळल्या मुळे ते कोरडे आणि रुक्ष वाटत होते . मला त्यांची लाज वाटू लागली मी चटकन पाय धुवून आले ..पण तिच्या इतके नितळ वाटत नव्हते. तिची पावले पण मऊ वाटत होती . घरातून जाताना मी तिला कापडी शूज घालताना पहिले ..बस्स! मला आता माझ्या पावलांना मऊ करण्यासाठी कापडी शूज हवे होते. बाबांना माझ्यासाठी शूज घ्यायला लावायचे. मी ठरवलं .पण मला माहिती होत कि माझ्या चप्पल हरविल्याशिवाय,खराब झाल्याशिवाय किंवा तुटल्याशिवाय हे शक्य नव्हते. म्हणून मी चप्पले पासून पिच्छा सोडविण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करू लागले . चप्पला मंदिरात विसरून येऊ लागले किंवा मैत्रिणी कडे ठेऊन येऊ लागले पण त्या काही माझी पाठ सोडत नव्हत्या. ओळखीची माणसं चप्पला परत आणून देत होते. मला त्या चप्पलांचा पिच्छा सोडवायचा होता ... नवीन शूज खुणवत होते. एकदा तर चप्पल ची वरची पट्टी कापावी म्हणून मी बाबांची दाढीचे ब्लेड ढापली . कापणार तोच आमचे छोटे बंधू गोटेश्वर टपकले . गोट्या पोलिसाप्रमाणे माझ्याकडे संशयी नजरेने पाहू लागला . मला महागात पडू नये म्हणून मी पटकन ब्लेड लपवलं. हा चुगली खोर बाबाना नक्कीच सांगेल मला खात्री होतीच. काय करता येईल.. मी वाट पाहत होते.. आणि एक दिवस आमच्या बोळात सायकल पार्क करताना मला एक आयडिया सुचली. ..

आमच्या अंगणातून पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी छोटी वाट केलेली सिमेंटची त्यावर फारश्या टाकलेल्या आणि आमची सायकल त्यावर पार्क करत असू . दोन फारश्यांमद्ये छोटी फट होती. त्यात आमचे पेन चावी पडली कि सहसा काढता येत नसे. मग काय मी आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून माझी एक चप्पल त्या फटीतून आत सरकवली. आणि मग बाबांना खोटेच सांगितले कि कुत्री मागे लागल्यामुळे पळताना पायातील एक चप्पल कुठे पडली कोणास ठाऊक ?नक्राश्रू पण काढले. भासवायला. सवयी प्रमाणे गोट्या माझा छोटा भाऊ आलाच मध्ये .. बाबा मी ताईची चप्पल शोधतो ..म्हणू लागला.मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला त्याला ... कि काय माहीत ती पिसाट कुत्री अजून तेथेच असतील वैगेरे पण गोट्या शेरलॉक होम समजायचं ना स्वतःला ..शेवटी मीच त्याला त्याच्या शोधात मदत करत म्हणाले चल मी पण येते .. आम्ही सायकल पार्किंग ची जागा सोडून सगळीकडे शोधले. मी तिकडे मुद्दामहून जात नव्हते. चुकून त्याची नजर पडली तर ... पण हा शेरलॉक हुशार मला म्हणाला .. इकडे पण शोधुयात चल

मी सतर्क होत म्हणाले जाऊ दे आता मला जाम कंटाळा आलाय ..आणि भूक पण लागलीय मी जाते आईनं केलेली थालीपीठ पण खायचीत... काय माहिती नंतर राहतात कि नाही पुन्हा …आणि आमचा शेरलॉक वितळला थालपिठावरील लोण्या सारखा ... वरवरचे पाहून तो पण म्हणाला इकडे पण नाही आहे बाबा दीदीची चप्पल !

आता चप्पल घेणे भाग आहे हे बाबांनी ओळखले. मी म्हणाले या वेळी चप्पल नकोच.. मला शूजच घ्या.(बॉबीसारखे)'चालेल उद्या संघ्याकाळी घेऊ .'इति बाबा . मग काय स्वारी खूषच!.. गोट्याने बाबांचा मूड बघून लगेच स्वतः साठी पण शूज ची डिमांड केली. पण मीच त्याचा बेत हणून पडला .. मला कोणतीच रिस्क नको होती.. त्याच्यामुळे माझापण बेत रद्द होऊ शकला असता म्हणून... दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी माझे सारे आवरले ..आज जरा ढगाळ वातावरण आहे ..'पाऊस पडेल कदाचित इति आई ..... पण तरी आज मला शूज घ्यायचाच '... मी 'हो ग बाई नक्की घेऊ ... छत्री आहे ना आपल्याकडे मग येताना पाऊस आला तरी बजाज कडे थांबून घेऊ तुला शूज ..'बजाज शु 'म्हणजे आमच्या शाळेच्या रस्त्यावरील शुजचे दुकान ...' चल रे गोट्या आवरलं का तुझं ' बाबा आमच्याच शाळेत शिक्षक होते. म्हणजे आम्ही बाबांच्या शाळेत शिकत होतो मी सातवीत आणि गोट्या पाचवीत होता. दोघेही बाबांसोबत सायकलवर जात असू. शेवटचा तास खेळाचा होता. मी माझे दप्तर आवरून मैदानावर गेले. गोट्याचा पण शेवटचा तास खेळाचाच होता. तो पण मैदानावर उद्या मारत होता पावसाचे थेम्ब पडल्यामुळे आम्ही मुली वर्गात गेलो. थोड्या वेळात शाळेची घंटा वाजू लागली. मी पटकन बाहेर आले आणि स्टाफरूम मध्ये बाबांना बोलवायला गेले. बाबापण निघालेच होते आम्ही सायकल पाशी आलो. गोट्या का नाही आला ? पटकन पाहून यावा म्हणून मी त्याच्या वर्गा कडे गेले पाहतेतर काय? गोट्या चे दोन्ही गुडघे फुटलेले त्याचे मित्र रुमाल बांधत होते त्यावर. मी गेल्यावर तो आणखीच रडू लागला. गोट्या काय रे हे.. कसा पडलास? सारखा धडपडत असतोस . मी त्याला पकडून बाबांकडे घेऊन आले. बाबांनी आम्हाला सायकल वर बसवून तडक घराकडे निघाले ... जोराचा पाऊस हि सुरू झाला. वाटेत मला ते बजाज शु दुकान दिसले पण .... बाबांनी त्याला वाटेतूनच डॉक्टरांकडे नेले. मला घरी जायला सांगितले.. मी तण तणतच च घरी गेले . ड्रेसींग करून गोट्या नि बाबा पण घरी आले. संध्याकाळी जेवताना माझा पडलेला चेहरा पाहून आईच म्हणाली 'उद्या सकाळीच शाळेला जाताना शूज घ्या हिला ,बिना चप्पल पोरीला काही ,लागायचं धुसयाच पायात हो ना? ' माझ्याकडे बघून किंचित हसत म्हणाली .. आई लोकांना बरोबर कळत आपल्याला काय हवाय ते ... मी उद्याची वाट पाहत होते. रात्रभर जोरात पाऊस झाला .सकाळी पावसाचा जोर सरला. आम्ही तयारी करून शाळेत जाण्यासाठी निघालो आणि सायकल काढण्यासाठी फारशीजवळ गेले तर समोरच्या बाजूला डबकं साचलं होत. अंगणातून आलेल्या पाण्याचं ..आणि त्यात माझी निळी चप्पल निवांत डुबकी मारत होती. समोरून गोट्या ओरडत आला दीदी ती बघ तुझी हरवलेली चप्पल...मी तिच्याकडे पाहत होते आणि..ती जणू मला म्हणत होती ... तेरा पिच्छा ना छोडूगी साथी रे !


🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌ 

 *https://chat.whatsapp.com/CRPiDnTjfnRJv017X6J5EK*


👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा**आत्ताच आमच्या ब्लॉग ला भेट द्या*  

 संकलन

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲

share करा......

 subscribe करा.......

 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....


 📲Share all educational group📲📲📲📲📲

Comments

Popular posts from this blog

तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर ..

अखेरचा हा तुला दंडवत

एक वृक्ष - कविता