अचानक काळाच्या प्रवाहात हरवले त्या सर्वांना...
""आयुष्य क्षणभंगुर आहे…""
विमान धावपट्टीवर सरकत होतं…
खिडकीबाहेरचं शहर हळूहळू लहान होत चाललं होतं, आणि आत बसलेली माणसं – कुणी पहिल्यांदाच विमान प्रवास करत होतं, कुणी रोजचं… पण प्रत्येकाच्या मनात एक समान भावना होती – "पोहोचल्यावर फोन करतो… वाट पाहू नकोस."
कुणी आईला टेक्स्ट केला, कुणी पत्नीला शेवटचा फोटो पाठवला. कुणी ऑफिसच्या ग्रुपवर “Take off ✈️” असा मेसेज टाकला… आणि कुणीतरी मनातल्या मनात एक प्रार्थना केली – "सगळं नीट होऊ दे."
पण त्या क्षणात, काळाने आपली योजना आखली होती.
एक मोठा आवाज, आगीचे ज्वाळा, आणि एका क्षणात सगळं संपलं.
पिशव्या, पासपोर्ट, मोबाईल, घड्याळं – सगळं जागेवर होतं… फक्त माणसं नव्हती. उरली फक्त धूर, राख, आणि त्यांच्या मागे पडलेली माणसांची वाट पाहणारी नजर…
त्या फोनवरचे शेवटचे मेसेज अजूनही वाचले गेले नाहीत.
"Call me when you land..."
"Miss you already..."
"Take care..."
कुठे रडणारी आई होती, कुठे गोंधळलेली मुलं, कुठे फोन कट झाल्यावर अजूनही “Hello… Hello?” म्हणणारा कोणी तरी.
कोणीच ठरवत नाही की शेवटचा टेक्स्ट कोणता असेल, शेवटची मिठी कोणती असेल, शेवटचा शब्द कोणता असेल…
त्यांनी मागे ठेवलेली स्वप्नं, आवाज, माणुसकी – हे सगळं आपल्याला एकच गोष्ट सांगतं...
"आयुष्य क्षणभंगुर आहे…
त्यामुळे प्रत्येक क्षण जगा – प्रेमाने, माफ करत, आणि अगदी मनापासून."
एक नम्र श्रद्धांजली त्या सर्व आत्म्यांना –
ज्यांनी कालच्या विमान दुर्घटनेत आपले प्राण गमावले.
*मृत्यू अटळ आहे… पण तो केव्हा येईल हे मात्र कुणालाच सांगता येत नाही. बर्याचदा तो येतो त्यावेळी आपली स्वप्ने तिथल्या तिथेच राहून जातात, तो येतो त्यावेळी आपल्या मागे राहिलेले आपल्या आप्तेष्टांच्या भावी आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण करून जातो. गेलेला माणूस परत येत नाही
🙏 नम्र श्रद्धांजली –🙏
जे काल अचानक काळाच्या प्रवाहात हरवले त्या सर्वांना...

Comments
Post a Comment