प्रपोज" डे स्पेशल
*📖✒️"प्रपोज" डे स्पेशल😘 ..✍️*
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
"प्रपोज" करणे म्हणजे एकमेकांनी एकमेकांप्रति प्रेम व्यक्त करणे...!
मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तू मला कायम सोबत हवी, माझे सर्वस्व तूच आहे, कायम साथ देशील का???
बस हेच प्रेम आणि हीच उत्कटता हवी आपल्या अभ्यासात..असेच वचन हवे तिला सुद्धा अणि अशीच साथ ती सुद्धा मागते.
मग तेव्हा तुम्ही देता का...???
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
आपल्या आयुष्यात प्रेम खूप महत्त्वाचे, त्याशिवाय राहणे खूप अवघड. प्रेम दोन अक्षरी शब्द पण विस्तार अतुलनीय, एकदम एखाद्या बिंदूप्रमाणे. मी, तुम्ही, विश्व कुणाच्या न कुणाच्या प्रेमात असतोच ना.
आयुष्यात दोन गोष्टी अशा आहेत की ज्या मिळाल्या तर आयुष्य सुधारून जातं आणि आणि चुकलं की आयुष्याची वाटच लागली असेच समजावं...!
त्यातील एक म्हणजे प्रेम आणि दुसरे म्हणजे शिक्षण... त्यामुळे योग्य वेळेत योग्य गोष्टी सिलेक्ट करता आल्या की आयुष्य एकदम मजेत... प्रेम खूप सुंदर आहे. आणि सगळ्यात स्वस्त देखील मिळतं म्हणून प्रेम नेहमी वाटत चलायला हवं..
म्हणजे ज्यांना मुलगा नाही त्यांचा मुलगा बनून प्रेम द्या, ज्यांना भाऊ नाही त्यांना भाऊ बनून प्रेम द्या, ज्यांना कोणीच नाही त्यांचे कोणीतरी बनून प्रेम द्या.
पण सांगणे एवढेच प्रेमाला फक्त काही नात्यापूरते मर्यादित ठेऊ नका. तर त्याला उडू द्या, व्याप्त होऊ द्या.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
_" कारण प्रेम हे वाटण्यासाठीच असते. प्रेमाशिवाय जीवन असेल पण जगणे प्रेमविना नाही. म्हणून कधीतरी असेही नाते जुळवून बघा. खूप जवळचे माणसे होऊन जातात, अगदी रक्ताच्या नात्यासारखी."_
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
🎼श्रद्धा धनेश🎼

Comments
Post a Comment